मुख्यमंत्री पशुवैद्यकीय स्वास्थ योजनेचा सोयगावात बोजवारा, फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टरांची मनमानी,कारवाई करणार कोण?
दिलीप शिंदे
सोयगाव : शेतकऱ्यांच्या पशूंना आहे त्याठिकाणी योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागांतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत सोयगाव तालुक्यात फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. मात्र ही योजना कागदावरच असून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना हेल्पलाईन १९६२ (टोल फ्री) व फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिकाऱ्याचा समन्वय नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशूंच्या स्वास्थतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सोयगावात नावालाच असल्याने पशुपालक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, डिगांबर पवार रा.मुखेड ता.सोयगाव या शेतकऱ्याकडे असलेला स्वमालकीचा सात वर्षीय गोऱ्यास (बैल) अठ्ठावीस दिवसांपूर्वी बनोटी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी पारधी यांनी कैची लावली होती. काही दिवसानंतर कैची लावल्या ठिकाणी गोऱ्यास जखम झाली. गोऱ्यास झालेल्या जखमला ड्रेसिंग करण्यासाठी शेतकऱ्यांने बनोटी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चकरा मारल्या परंतु कोणतीही दखल घेतली नाही. कैचीची जखम सडल्याने फिरता पशुवैद्यकीय दवाखाना हेल्पलाईन १९६२ वर शेतकऱ्यांने दि.०१ व दि.०२ मे ला मोबाईलद्वारे संपर्क साधला परंतु कोणताही प्रतिसाद हेल्पलाईन कडून मिळाला नाही.दि.०३ मे ला पुन्हा शेतकऱ्यांने १९६२ वर संपर्क साधला त्यावेळेस महापशुधन संजीवनी टोल फ्री १९६२ मध्ये नोंदणी क्रमांक (०३०४०१२०३०५२४००००००२) नोंद झाली असून डॉक्टरचे नाव मंगेश सुरेशराव काळे मो.न.९८३४०९०६८६ यांच्याशी संपर्क साधावा असा मॅसेज आला. पुन्हा BFILMH वरून मॅसेज आला दि.०४ मे रोजी डॉक्टरांनी दुपारी ०२:२१ मिनिटांनी भेट निश्चित केली आहे. शेतकऱ्यांने संबंधित डॉक्टरांशी संपर्क केला असता काळे यांनी कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले. शेतकऱ्यांने कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता गोऱ्याच ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी आयोडीन बँडेज व इतर साहित्य जमा करावे लागेल त्यामुळे मी मंगळवारी येतो असे सांगितले. हेल्पलाईन ने दि.०४ मे ला भेट निश्चित केली असताना देखील पाच दिवसांचा कालावधी लोटला असून गोऱ्याला (बैल) उपचार मिळत नसल्याने त्याची तब्बेत खालावत चालली आहे. कैची लावली त्याठिकाणची जखम सडली असून दुर्गंधी येत असल्याचे शेतकऱ्यांने सांगितले.
मुख्यमंत्री पशुवैद्यकीय स्वास्थ योजनेचा सोयगावात बोजवारा, फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टरांची मनमानी,कारवाई करणार कोण?
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:०९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:०९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: