शस्त्रतस्करी करणारी टोळी जेरबंद; ७ गावठी पिस्तुले जप्त


पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने बेकायदा शस्त्रतस्करी करणारे एक रॅकेट उध्वस्त केले असून ३ आरोपींना अटक करत त्यांच्याकडून ७ गावठी पिस्तुले आणि राऊंड जप्त केले आहेत.

अर्जुन भाऊराव सुर्यवंशी वय २० वर्षे रा. कोकण धर्मशाळा पदमावती रोड आळंदी, तुषार नथुराम बच्चे, वय ३१ वर्षे, रा शिवाजीवाडी शिव क्लासीक सोसायटी समोर, मोशी,कमल रामदास राठोड, २६ वर्षे, रा नानेकरवाडी, ता खेड, जि पुणे  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

दरोडाविरोधी पथकाच्या कर्मचार्‍यांना सराईत गुन्हेगार अर्जुन सूर्यवंशी हा २८ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास मरकळ गाव येथे गावठी इप्स्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ गावठी पिस्तुले आणि २ राऊंड आढळले. त्याच्यावर आळंदी पोलीसठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करून तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड शहरातील बेकायदा शस्त्र विक्रेता अंकित भस्के याच्याकडून ही पिस्तुले विकत घेतली असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच त्याच्याकडून विकत घेतलेली आणखी दोन पिस्तुले तुषार बच्चे याच्याकडे ठेवली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेगाने हालचाल करत बच्चे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ पिस्तुले आणि १ राऊंड जप्त केला.

ही पिस्तुले विकणारा अंकित भस्के पारनेर येथे न्यायालयीन कोठडीत होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास केला आणि त्याच्याकडून २ पिस्तुले व १ राऊंड पोलिसांनी जप्त केला. त्याने कमल राठोड याला पिस्तूल विकल्याची दिली. त्यानंतर पोलिसांनी कमल राठोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ गावठी पिस्तूल आणि १ राऊंड जप्त करण्यात आला.

अर्जुन सूर्यवंशी, तुषार बच्चे आणि अंकित भस्के हे सराईत गुन्हेगार आहेत. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे , अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त, गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे (अति. कार्यभार) शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, राहूल खारगे, प्रविण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, गणेश हिंगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नागेश माळी, प्रमोद उलगे यांनी केली.

शस्त्रतस्करी करणारी टोळी जेरबंद; ७ गावठी पिस्तुले जप्त  शस्त्रतस्करी करणारी टोळी जेरबंद; ७ गावठी पिस्तुले जप्त Reviewed by ANN news network on ५/०६/२०२४ ०५:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".