राहुल गांधीची चायनीज गँरंटी आणि मोदीजींची भारतीय गॅरंटी यांची ही निवडणूक! : अमित शाह

 



सांगलीतील सभेत  हल्लाबोल

 

मुंबई : या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहेतर दुसरा गट राम मंदिर बनविणारा आहे. एका बाजूस व्होट जिहाद पुकारणारे लोक आहेततर दुसरी बाजू व्होट फॉर विकास मानणारे आहेत. एका बाजूला परिवाराचा विकास करणारे लोकतर दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करणारे लोक आहेत. एका बाजूस राहुल गांधींची चायनीज गॅरंटी आहेतर दुसरीकडे मोदीजींची भारतीय गॅरंटी आहे. ही निवडणूक अशा दोन बाजूंमधील निवडणूक आहेअशा शब्दांत विरोधकांवर हल्ला चढवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगलीतील सभा गाजविली. कृषी आणि सहकारमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलेराज्यातील 101 सहकारी साखर कारखाने कोणामुळे बंद झालेजिल्हा बँकांवर प्रशासक कोणामुळे आलेयाचा खुलासा कराअसे आव्हानही श्री.शाह यांनी शरद पवार यांना दिले.

 

सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना श्री.शाह यांनी मोदी सरकारच्या कामांची संपूर्ण माहिती मांडली. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराडराज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेआ.सुधीर गाडगीळआ.गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते. कोविडसारख्या महामारीच्या काळात कोविडची लस देऊन देशाला वाचविण्याचे काम मोदी यांनी केले. राहुल गांधी अगोदर लसीकरणास विरोध करत होतेपण संपूर्ण देश लस घेत असल्याचे दिसताच एका रात्री गुपचूप राहुल गांधी यांनीही लस घेतलीअशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.



 मोदी जे बोलतात ते करून दाखवितात. अयोध्येत भव्य राम मंदिर बनविणार अशी ग्वाही भाजपा ने दिली होती. काँग्रेसने सत्तर वर्षे राम मंदिराचा प्रश्न रखडविला. मोदीजींनी पाच वर्षांत मंदिर बनविलेप्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना केली आणि पाचशे वर्षांची देशाची प्रतीक्षा पूर्ण केली. शरद पवारउद्धव ठाकरेराहुल गांधीप्रियंका गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला. जे रामाच्या प्रतिष्ठापनेसोबत नाहीतत्यांच्यासोबत देशातील जनता असणार नाहीअसेही श्री.शाह म्हणाले.     


महिलांसाठी लोकसभाविधानसभेत 33 टक्के आरक्षण देऊन मातृशक्तीच्या सक्षमीकरणाचे ऐतिहासिक काम मोदी यांनी केले. तिहेरी तलाक रद्द करण्याचे काम मोदी यांनी केले. पीएफआयवर बंदी मोदींनी आणलीअसे सांगत श्री.शाह यांनी मोदी सरकारच्या कामांची यादीच सादर केली. आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणामुळे बंद झाला याचे उत्तर शरद पवार यांनी दिले पाहिजेअसे सांगत श्री.शाह यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. टेंभू सिंचन योजनेचे 1998 मध्ये सुरू झालेपण 2014 पर्यंत काहीच झाले नाही. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच काम सुरू झालेम्हैसाळ सिंचन योजनेमुळे 65 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली. आज महाराष्ट्रात 202 पैकी 101 साखर कारखाने बंद कसे झालेदहा वर्षे कृषी आणि सहकार मंत्री असताना तुम्ही काय केलेराज्यातील 34 जिल्हा बँकांपैकी तीन चार बँका वगळता बाकी सर्व बँकांवर प्रशासक कोणाच्या चुकीमुळे आलेयाची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीतअसे आव्हानही श्री.शाह यांनी दिले.


श्री. शाह म्हणाले,  संजयकाका पाटील यांच्यासाठी दिलेले एकएक मत मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणारे व देशाला समृद्ध करणारे ठरणार आहे. देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर सोडून सोनिया काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग पायउतार झाले आणि जनतेने सत्तेवर बसविल्यावर पाच वर्षांतच मोदीजींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. मोदीजींना प्रधानमंत्री बनविणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणेदेशाच्या सुरक्षिततेची हमी मिळविणे आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करादेशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार ही मोदीजींची गॅरंटी आहेअशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

राहुल गांधीची चायनीज गँरंटी आणि मोदीजींची भारतीय गॅरंटी यांची ही निवडणूक! : अमित शाह राहुल गांधीची चायनीज गँरंटी आणि मोदीजींची भारतीय गॅरंटी यांची ही निवडणूक! : अमित शाह Reviewed by ANN news network on ५/०४/२०२४ ०९:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".