विठ्ठल ममताबादे
उरण : केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण,श्री साई संस्थान साईनगर वहाळ, डाबर इंडिया कंपनी,जायंटस ग्रुप ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्त्या संगीता सचिन ढेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील रानसई उरण येथे आदिवासी पाड्यातील १० गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले .
त्याचप्रमाणे येथील आदिवासी पाड्यातील रहिवासी यांना डाबर इंडिया कंपनीचे ज्यूस, शॅम्पू ,कोलगेट, गुलाबजाम प्री, आलं लसूण पेस्ट, ग्लुकॉन डी, मसाला यांचे वाटप करण्यात आले.३२५ हुन जास्त आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी संदीप पतंगे- महाराष्ट्र राज्य अन्न व औषधे असिस्टंट कमिशनर ,श्री साई संस्थान साईनगर वहाळ संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण राजू दादा मुंबईकर, आगरी कोळी कराडी समाजाचे उपाध्यक्ष व पनवेल रिटघर येथील माजी सरपंच भरत दादा भोपी ,श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या व जायंट्स ग्रुप ऑफ उरण च्या अध्यक्ष संगीता सचिन ढेरे ,फेडरेशन युनिट डायरेक्टर श्रीमती प्रियवंदा तांबोटकर ,माजी अध्यक्ष देवेंद्र पिंपळे, माजी अध्यक्ष ॲड .दक्षता पराडकर, सामाजिक कार्यकर्ता सचिन ढेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
राजू मुंबईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उरण पनवेल पेण तालुक्यातील आदिवासी समाजातील मुलीला लग्नासाठी दहा हजार देणार असल्याचा संकल्प केला. गोर गरीब आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती अगोदरच खराब आहे. महागाई वाढलेली आहे. आदिवासी समाजाला संपूर्ण आयुषभर जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पैसे जवळ नसल्याने अनेक आदिवासीची लग्न होत नाहीत. अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी मित्र म्हणून सुपरिचित असलेले राजू मुंबईकर यांनी आदिवासी समाजातील प्रत्येक मुलीला लग्नाच्या वेळी दहा हजार रुपये देण्याचा संकल्प केला आहे.या निर्णयामुळे आदिवासी बांधवाना खूप मोठा दिलासा मिळाल्याने सर्व आदिवासी बांधवांनी राजू मुंबईकर यांचे जाहीर आभार मानले.
आदिवासी समाजातील प्रत्येक मुलीला लग्नासाठी दहा हजार रुपये देण्याचा राजू मुंबईकर यांचा संकल्प
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२४ ०५:२०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२४ ०५:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: