पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील भोसरीगाव येथील महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंत्याला ३० एप्रिल रोजी दुपारी ४५ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयातील अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
किरण गजेंद्र मोरे रा. सुदर्शन सोसायटी, सी विंग सेक्टर १, इंद्रायणीनगर, भोसरी असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध प्रशांत भास्कर महाजन, रा. सेक्टर ६, फ्लॅट नं. सी २०२, निओरिगल अपार्टमेंट, स्पाईनरोड, मोशी यांनी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
या प्रकरणी एम. आय. डी. सी. भोसरी पोलीसठाण्यात २२१/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महाजन यांनी विद्युतभार वाढवून मिळण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला होता. त्याला मंजुरी देण्यासाठी आरोपी मोरे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ४५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. या दरम्यान महाजन यांनी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार केली. या खात्याच्या अधिकार्यांनी सापळा लावला. आणि ३० एप्रिल रोजी दुपारी मोरे याला ४५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयाचे उपनिरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
५/०१/२०२४ ०३:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: