मुंबई: त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले. पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनानन, क्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविस, भारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली भारत दौर्यावर
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२४ ०८:३८:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२४ ०८:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: