पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा किळसवाणा उद्योग : चित्रा वाघ

 



उबाठा गटाच्या जाहिरातीत झळकतोय पॉर्न स्टार; भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ कडाडल्या

 

मुंबई :  छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉपपार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत असा प्रहार भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला.


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बनभाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल पेंडसे यावेळी उपस्थित होते.


श्रीमती चित्रा वाघ यांनी सांगितले कीलोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उबाठा शिवसेने तर्फे बनवलेल्या जाहिरातीमधून एक पॉर्न स्टारच जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा सवाल विचारत आहे. आपल्या प्रचारासाठी उबाठा शिवसेनेची जाहिरात पाहून स्त्रीपत्नीआई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेनं खाली झुकली गेली. उबाठा च्या निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनीठाकरे परिवार तसेच जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठवणारा पॉर्न स्टार आणि उबाठा शिवसेना यांचा संबंध काय आहे याचे उत्तर ठाकरे यांनी महाराष्ट्राला द्यावे. या जाहिरातीबद्दल उबाठा शिवसेनेने आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असे आव्हानही श्रीमती वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिले.


श्रीमती वाघ म्हणाल्या की निवडणुकीच्या काळात आणि त्याआधी पासून उबाठा गटाचे नेते महिलांचा वारंवार अपमान करत आहेत. अमरावती येथील महायुतीच्या महिला उमेदवाराबाबत उबाठा नेत्यांनी कोणती भाषा वापरली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यापुढे जाऊन उबाठा शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत उल्लू ॲप या अश्लील ॲप वरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रीकरण करणाऱ्या पॉर्नस्टार च्या माध्यमातून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. जाहिरातीत पित्याची भूमिका करणारा पॉंर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो यासारखी महिलांची क्रूर चेष्टा कोणी केली नसेल. उद्धव ठाकरेंची वैचारिक पातळी इतकी घसरली का असा संतप्त सवाल ही श्रीमती वाघ यांनी केला.  


केंद्रातील मोदी सरकारने आधीच अनेक अश्लील ॲप्स वर बंदी घातली असून उल्लू ॲप वर ही बंदी घालावी अशी मागणी श्रीमती वाघ यांनी केली. 

पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा किळसवाणा उद्योग : चित्रा वाघ पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा किळसवाणा उद्योग : चित्रा वाघ Reviewed by ANN news network on ५/०२/२०२४ ०३:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".