गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज....अल्पवयीन मुली फुसलावून पळवून नेण्याची दुसरी घटना....
दिलीप शिंदे
सोयगाव : गावातील बळीराम शंकर इंचाटे याच्यावर संशय व्यक्त करीत अल्पवयीन मुलीला फुसलावून पळवून नेल्याची तक्रार युवराज उत्तम जाधव रा.पळाशी ता.सोयगाव यांनी दि.१९ फेब्रुवारी रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात दिल्याने भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८५ दिवसांचा कालावधी लोटला असून देखील पोलिसांना अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात अपयश येत असल्याने कुटुंबाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पळाशी ता.सोयगाव येथील रहिवासी असलेले युवराज उत्तम जाधव वय ४० वर्षे यांची पळाशी शिवारात गट क्रमांक १२६ मध्ये पाच एकर जमीन असून ते शेतात घर करून पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंबासह राहतात. मुलगी शीतल जाधव ही साडू शिवाजी विठ्ठल पवार रा.चिंचोली ता.कन्नड येथे ११ वी वर्गात शिक्षण घेत आहे.मुलगी गेल्या एक महिन्यापासून गावी पळाशी येथे आली आहे. दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पत्नी निर्मलाबाई व दोन्ही मुलांसह जेवण करून रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरासमोरील वसरीत झोपलो होतो.मुलगी शीतल ही तिच्या बाजीवर झोपी गेली होती.रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास जाधव हे लघुशंकेसाठी उठले असता मुलगी शीतल ही बाजीवर दिसून आली नाही.मी व पत्नी निर्मलाबाई आम्ही दोघांनी घराच्या आजूबाजूला मूलगीचा शोध घेतला ती मिळून आली नाही.त्यानंतर पळाशी गावात, बनोटी व नातेवाईकांकडे शोध घेतला मुलगी शीतल ही मिळून आली नाही. तिचे वर्णन पुढील प्रमाणे नाव शीतल युवराज जाधव वय १७ वर्षे १६ दिवस,व्यवसाय शिक्षण ११ वी, चेहरा लांबट,नाक सरळ,रंग गोरा,अंगात काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व पिवळ्या रंगाचा टी शर्ट, उंची १५४ से.मीटर, भाषा मराठी,हिंदी. मुलगी शीतल हिस गावातील बळीराम शंकर इंचाटे याने फुसलावून पळवून नेल्या बाबत संशय आहे. मुलगी शीतल जाधव हिचा शोध होणे बाबत सोयगाव पोलीस ठाण्यात दि.१९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या शोध लावण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याने कुटुंबाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील दुसरी घटना
करिना दणके वय १६ वर्षे या अल्पवयीन मुलीस फुसलावून पळवून नेल्याची तक्रार मुलीची आई श्रीमती मायाबाई दणके यांनी दि.१३ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारी वरून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६३ नुसार सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पाच महिन्याचा कालावधी लोटला मात्र मुलीचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने कुटुंब चिंतेत आहे.तर शीतल जाधव वय १७ वर्षे १६ दिवस या अल्पवयीन मुलीस फुसलावून पळून नेल्याची तक्रार दि.१९ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील युवराज जाधव यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिली. या दोन्ही घटना सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून दोन्ही मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर नागरिकांमधून प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर तालुक्यात महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही मुलींचा शोध लागत नसल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे श्रीमती मायाबाई दणके व युवराज जाधव यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात सोयगाव पोलीस अपयशी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२४ ०९:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: