पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून २०२३ ते मार्च २०२४ या काळात चोरीस गेलेल्या मोबाईल फोन्सपैकी ७० मोबाईल्स पुन्हा हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखेला यश आले आहे. या हस्तगत केलेल्या मोबाईल्सची किंमत १० लाख १४ हजार ७०० रुपये आहे.
वरील कालावधीत शहरात मोबाईलचोरीच्या प्रकरणात वाढ झाली होती. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन चोरीस गेलेले मोबाईल्स हस्तगत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हेशाखेला आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमधून हे मोबाईल जप्त करण्यात आले. यामध्ये आयफोन, वनप्लस, विवो, मोटोरोला, सॅमसंग, रेडमी, नोकिया आदी कंपन्यांच्या मोबाईल्सचा समावेश आहे.
लवकरच एका समारंभात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात येणार आहेत.
ही कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार प्रवीण कांबळे, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रविण माने, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील माळी व हुलगे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: