पुणे : पुणे जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे १४४ कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. ४ जून रोजी पहाटे ००.०१ पासून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत १४४ कलम लागू राहणार आहे.
या कालावधीत सर्व मतमोजणी केंद्रामध्ये आणि 100 मीटर परिसरात मोबाईल, लॅपटॉप, आय पॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगांव पार्क, पुणे येथे होणार आहे. तर 36 - शिरुर, लोकसभा मतदार संघाची मतमोजणी स्टेट वेअरहाऊस, गोडावून नं.2, Block P - 39, MIDC एरिया रांजणगांव, कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे येथे होणार आहे.आणि, मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम येथे होणार आहे. तेथे हे आदेश लागू होणार आहेत.
-----

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: