तयार कपड्यांच्या दोन दुकानांवर कारवाई, १० लाखाचा माल जप्त
पिंपरी : पिंपरी कॅम्पमधील बाजारपेठेतील दोन तयार कपड्यांच्या दुकानात डुप्लिकेट माल विकला जात असल्याने पोलिसांनी १० लाखांचे डुप्लिकेट कपडे जप्त करीत दोन्ही दुकानांच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय चंद्रकांत भोजवानी (रा. ज्योतीबा मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी, पिंपरी), संजू दिलीप बसंतानी (रा.नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची पिंपरीतील साईचौकात शिव गारमेंट्स, संजय ट्रेडलिंक या नावाची तयार कपडे विक्रीची दुकाने आहेत.
या दुकानातून डुप्लिकेट माल नामवंत कंपन्यांचा आहे असे भासवून विकला जात असल्याची तक्रार महेश विष्णू कांबळे (वय-४१ रा. जनवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली. कांबळे हे युनायटेड अँड युनायटेड ट्रेडमार्क अँड ऑथॅरीटी, नवी दिल्ली या कंपनीत तपासी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी या दोन्ही दुकानात डुप्लिकेट माल विकला जात असल्याची खात्री केली.त्यानंतर पिंपरी पोलीसठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दुकानात तपासणी केली असता अंडर आर्मर, नायके, जॉर्डन या नामवंत कंपन्याचे लोगो असलेला डुप्लिकेट माल पोलिसांना आढळला. सुमारे १० लाख रुपयांचा डुप्लिकेट माल पोलिसांनी जप्त केला.
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२४ ०३:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: