सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा


देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे

शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर

  सिंधुदुर्गनगरी  : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. 

  महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी येथील पोलिस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पेालिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, उप जिल्हा नियोजन अधिकारी श्री पवार आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री तावडे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, समाजसुधारक, क्रांतिकारांची भूमी आहे.  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची प्रतिभाशाली वाटचाल सुरु आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. शेतकरी,कष्टकरी, कामगार यांनी आपल्या घामातून राज्य प्रगतीपथावर नेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या सुपुत्रांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना  आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो. राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे देखील मी  आभार मानतो. 1 मे 1981 रोजी आपला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्त्वात आला त्याला आज 43 वर्ष होत आहेत. आज आपला जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. या निमित्तानेही त्यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सध्याचा  उन्हाचा वाढता पारा पाहता सर्व  नागरिकांनी आपल्या आरोग्याचीही काळजी  घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. 


उत्कृष्ट कामगिरी-

1. श्वान ब्राव्हो (अंमलीपदार्थ शोधक)- आतापर्यत श्वान ब्राव्हो याने कोकण परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये 1 सिल्वर मेडल व 1 ब्रॉझ मेडल मिळविलेले आहे. तसेच ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 मध्ये BSF श्वान प्रशिक्षण केंद्र टेक्कनपुर मध्यप्रदेश येथे प्रशिक्षणा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामधुन व्दितीय क्रमांक मिळविलेला आहे. 

महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने परेड संचालनामध्ये सहभाग -

राखीव पोलीस निरीक्षक-  रामदास नागेश पालशेतकर, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग.

सेकंड परेड कमांडर, परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भांड कुडाळ पोलीस ठाणे. 

प्लाटुन क्रमांक 01, महीला पोलीस अंमलदार, प्लाटुन कमांडर, परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे कणकवली पोलीस ठाणे. प्लाटुन क्रमांक 03 होमगार्ड पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक चालक ,श्वान ब्राव्हो (अंमलीपदार्थ शोधक),वज्र वाहन, फॉरेन्सिक लॅब, दंगल नियंत्रक पथक, अग्निशामक बंब, रुग्णवाहीका-108 यांचा समावेश होता. 


सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते  ध्वजारोहण Reviewed by ANN news network on ५/०१/२०२४ ०१:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".