मुंबई : टाटा स्टील आणि ब्ल्यूस्कोप स्टील यांचा संयुक्त उद्यम, टाटा ब्ल्यूस्कोप स्टील या कोटेड स्टीलच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीला ईटी एजने "बेस्ट ऑर्गनायझेशन्स फॉर विमेन" पैकी एक म्हणून पुरस्कृत केले आहे. २१ मार्च २०२४ रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या बेस्ट ऑर्गनायझेशन्स फॉर विमेन कॉन्क्लेव्ह २०२४ च्या चौथ्या आवृत्तीचा एक भाग म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बेस्ट ऑर्गनायझेशन्स फॉर विमेन कॉन्क्लेव्हमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता यांना चालना देणाऱ्या व्यवसायांचा सन्मान केला जातो. महिलांना वृद्धी संधी पुरवणाऱ्या आणि त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या कंपन्यांना यंदाच्या वर्षी पुरस्कृत करण्यात आले. आपल्या संशोधन सहयोग्यांच्या सहकार्याने ईटी एजने अशा १००० ब्रँड्सचे मूल्यांकन केले ज्यांनी सर्वोत्तम कंपन्या बनण्याचे कमीत कमी ८०% पात्रता निकष पूर्ण केले आहेत.
महिलांसाठी कामाच्या सर्वोत्तम जागांपैकी एक म्हणून टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलला देण्यात आलेला पुरस्कार कामाच्या ठिकाणी लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याप्रती आणि महिलांना सक्षम बनवण्याप्रती कंपनीची अढळ बांधिलकी अधोरेखित करतो. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने 'आर्या अनबाउंड विमेन लीडरशिप प्रोग्राम' सारखे लीडरशिप प्रोग्राम सुरु केले आहेत ज्यामध्ये महिलांना नेतृत्व जबाबदाऱ्या आत्मविश्वासपूर्वक सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि साहाय्य पुरवले जाते. याशिवाय #SheAll उपक्रमामध्ये कार्यक्षमता वाढवणारे कामाचे वातावरण सर्वांसाठी निर्माण करण्याचे, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातात. वृद्धी आणि यश संपादन करण्याच्या संधी सर्वांना समान उपलब्ध व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने सर्वसमावेशक एचआर धोरणे आखली आहेत. यामध्ये काम आणि आयुष्य यातील संतुलन, रिमोट काम, वेलनेस रजा, बाळंतपणातील लाभ आणि बांधकाम साईट कामगारांसाठी सुविधा यांचा समावेश आहे. आमच्या कामगारांच्या सर्वसमावेशक कल्याणाला साहाय्य करण्याप्रती कंपनीची निष्ठा यामधून दर्शवलेली आहे. 'मुस्कान' हे कामगारांसाठी चालवले जाणारे पाळणाघर आणि अनेक वेगवेगळे पुरस्कार यासारख्या उपक्रमांमधून उत्कृष्टतेची संस्कृती निर्माण करावी आणि प्रत्येकाच्या खासकरून महिलांच्या अनोख्या क्षमतांचा सन्मान केला जावा हा कंपनीचा उद्देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: