कराड : निवडणुकीचा बंदोबस्त आटोपून पाटणकडून कराडकडे निघालेल्या पोलिसांच्या खासगी बसला (एमएच ५० एन ५०२०) कराड चिपळूण रस्त्यावर अपघात झाला असून यात ३ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य १२ जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना कराडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
कराड विमानतळानजिक गोटे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. बसला समोरून येणा-या ट्रकने हूल दिल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. आणि बस रस्त्याशेजारी असलेल्या पडक्या घरावर जाऊन आदळली. पोलिसांनी हूल देणा-या ट्रकचालकाला ट्रकसह ताब्यात घेतले आहे.
बसमधील पोलीस तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक के.एन.पाटील
यांनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक समीर शेख यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०६:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: