देहुरोड येथील दाखलेबाज गुंड आकाश पिल्ले याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी; एमपीडीएखाली कारवाई


 विशेष प्रतिनिधी देहुरोड

देहुरोड : देहुरोड परिसरातील सराईत, दाखलेबाज गुंड आकाश पिल्ले याला एमपीडीए कायद्यान्वये १ वर्ष येरवडा तुरुंगात डांबण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतेच दिले आहेत. उपायुक्त बापू बांगर यांनी ही माहिती दिली.

आकाश अरमुगम पिल्ले वय २४ वर्षे, रा. देहुरोड याने स्वत:ची टोळी तयार करून  देहुरोड, किवळे परिसरात परिसरात अनेक गुन्हे करत दहशत निर्माण केली होती. जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे एकूण १५ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने त्याला १ वर्षासाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले होते.  मात्र, तरीही त्याची गुन्हेगारी कृत्ये चालूच असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. त्याच्याविरोधात कोणीही तक्रार देण्यास धजावत नव्हते.

त्याची ही दहशत मोडून काढण्यासाठी देहुरोड पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांनी पिल्ले विरोधात एमपीडीएखाली कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.  आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला मंजुरी दिली.

३ मे रोजी पोलिसांनी पिल्ले याला ताब्यात घेऊन त्याची येरवडा तुरुंगात रवानगी केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्तविनयकुमार चौबे,  अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ - २ बापू बांगर , सहाय्यक आयुक्त, देहुरोड विभाग श्री. घेवारे, वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्या  मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, अंमलदार अनिल जगताप, धिरज अंभोरे, शुभम बावनगर, स्वप्नील साबळे व इतर यांनी केली. 


देहुरोड येथील दाखलेबाज गुंड आकाश पिल्ले याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी; एमपीडीएखाली कारवाई देहुरोड येथील दाखलेबाज गुंड आकाश पिल्ले याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी; एमपीडीएखाली कारवाई Reviewed by ANN news network on ५/०४/२०२४ ०८:१९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".