माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

 


पुणे : पुण्यातील माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

गांगुर्डे १९९९ मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्या काळात त्यांनी या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.

त्यांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. १९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले. 

विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते नेहमीच पुरस्कर्ते होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. 

माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन Reviewed by ANN news network on ५/१६/२०२४ ०३:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".