नाशिक: नाशिकमध्ये एका सराफाच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे घातल्याचे वृत्त आहे. या छाप्यात मोठी रक्कम आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
नाशिक, जळगाव आणि नागपूर येथील आयकरखात्याच्या पथकांनी ही कारवाई केल्याचे समजते. या कारवाईत एका खोलीत नोटांच्या बंडलांचा खच पडला असल्याचे अधिकार्यांना आढळलेली रक्कम मोजण्यासाठी अधिकार्यांना १४ तास लागल्याची चर्चा असून या छाप्यात २६ कोटी रुपये रोख आणि सुमारे ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे आयकर अधिकार्यांनी जप्त केली असल्याचे समजते.
मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा परिसरावर आयकर खात्याच्या अधिकार्यांनी लक्ष केंद्रित केले असून यामुळे बेहिशेबी मालमत्ता बाळगून असलेल्या व्यापारी, उद्योजकांचे धाबे दणाणले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२६/२०२४ ०१:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: