दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२३-२४ या वर्षाचा पीकविमा सरलगट देण्यात यावा अशी मागणी भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजीवन सोनवणे यांनी दि.२४ शुक्रवारी कृषिमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये शासनाच्या व हवामान खात्याच्या नियमानुसार सोयगाव तालुका अति दुष्काळी घोषित झालेला असून जिल्ह्यातील तालुके सुद्धा घोषित झालेले आहे.आज रोजी शेतकरी दुष्काळाच्या झळा शोषित असून शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांची अशी भयावह परिस्थिती असतांना सुद्धा शासनाने निर्धारित केलेल्या विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांनाच विमा मंजूर करून वाटप करीत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु तक्रार केलेली नाही अशा हजारो शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार न दाखल केल्याची कारणे दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून डावलण्याचा प्रकार चालू आहे.
अति दुष्काळ व अति दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नायब तहसिलदार विठ्ठल जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजीवन सोनवणे,भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर मनगटे,सुनील गव्हांडे आदींची उपस्थित होते
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा सरसकट देण्याची मागणी..
Reviewed by ANN news network
on
५/२४/२०२४ ०८:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: