नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. शहरात एकही अनधिकृत होर्डिंग यापुधे दिसणार नाही असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेटे यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या धुळीच्या वादळामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर मोठे होर्डिग कोसळल्यामुळे आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महालिपालिका अलर्ट मोडवर आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय धेतला आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेने कारवाईस सुरुवातही केली आहे. अतिक्रमण विभागाची जबाबदारी असलेले उपायुक्त राहुल गेटे, सहाय्यक आयुक्त डॉ अजय गडदे, उपअभियंता रोहित ठाकरे यांनी काल रात्रभर रहदारी कमी असताना विभाग नेरुळ व घणसोली, दिघा, ऐरोली, बेलापूर परिसरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम राबविण्यात आली.
नागरिकांनी या मोहिमेबद्दल पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: