उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले!; पायलट सुदैवाने वाचला! (VIDEO)
महाड : उद्धवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना महाडहून बारामतीकडे नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले असून पायलट सुदैवाने बचावला आहे.
महाड येथील सभा आटोपून अंधारे या रात्री महाडमध्ये मुक्कामाला होत्या सकाळी त्यांना बारामतीकडे हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले. खाली उतरण्यासाठी हेलिकॉप्टरने दोन तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज होऊन ते खाली कोसळले. त्यामुळे हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले. स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेत पायलटला केबिनबाहेर काढले.
हा अपघात तांत्रिक बिघाड, निर्वात पोकळी की अन्य कारणामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे आपल्या सहकार्यासह हेलिपॅडजवळ होत्या.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, आता बारामतीतील कार्यक्रमासाठी जायचे होते. आम्हाला बारामतीकडे नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते. खाली उतरण्यासाठी त्याने दोन तीन घिरट्या घातल्या. पण अचानक मोठा आवाज करत ते खाली कोसळले. स्थानिक नागरिकांनी पायलटला त्यातून बाहेर काढले.तो सुखरूप आहे. मी माझा सहकारी, लहान भाऊ विशाल गुप्ते सगळे सुखरूप आहोत. काळजी नसावी.पुढील दौरा सुरू राहील.
Reviewed by ANN news network
on
५/०३/२०२४ १२:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: