पवन कुमार चमाडिया द ब्रदरहुड फाऊंडेशनचे नवे अध्यक्ष

 

आई-वडीलांच्या रुपात देव आपल्या घरातच असतो : संजय घोडावत

 पुणे: सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आणि तरुणांना प्रेरणा देणारे अग्रवाल समाजाची द ब्रदरहुड फाऊंडेशन पुणे ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात असून इंस्टॉलेशन सोहळा 2024-2025 पुणे येथे पार पडला.  उद्योगपती संजय घोडावत यांनी पवनकुमार चमाडिया यांना ब्रदरहुड फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाची शपथ दिली.  तसेच द ब्रदरहुड फाऊंडेशनचे नूतन सचिव म्हणून प्रशांत अग्रवाल आणि  ट्रेजरर नरेंद्र गोयल, सहसचिव नरेश गोयल यांच्यासह सर्व नवीन पदाधिकारी व सदस्यांनी शपथ घेतली व पदभार स्वीकारला.
उद्योगपती संजय घोडावत यांनी द ब्रदरहुडच्या इंस्टॉलेशन समारंभात मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपल्याला यश देणारा आपला देव आई-वडिलांच्या रूपाने आपल्या घरात विराजमान आहे.  त्यांच्या आशीर्वादाने पुढे जाणारी व्यक्ती यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचते.  द ब्रदरहुड आणि अग्रवाल समाजातील लोक हे चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्याचे पालनही करतात, त्यामुळेच हा समाज प्रगती आणि यशाच्या मार्गावर सतत पुढे जात आहे.  या कार्यक्रमात त्यांनी आपल्या व्यवसायाच्या यशाचे रहस्यही सांगितले आणि उपस्थित व्यावसायिकांना व्यवसायाचा मंत्रही दिला.  

द ब्रदरहुड फाऊंडेशन पुणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवन कुमार चमाडिया यांनी 2024-2025 या वर्षासाठी द ब्रदरहुड फाऊंडेशन पुणेच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी अध्यक्ष पवन जैन, कविता जैन यांच्याकडून स्वीकारले.   यासाठी ब्रदरहुड पुणेच्या 27 व्या स्थापना दिनानिमित्त हॉटेल नोव्होटेल, विमान नगर येथे भव्य इंस्टालेशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत होते.  इंस्टॉलेशन समारंभ 2024-2025 मध्ये सर्व अधिकारी व सदस्यांना शपथ देण्यात आली. नवीन कार्यकारिणीत पवन जैन (आयपीपी), सागर अग्रवाल (उपाध्यक्ष), संजय बी अग्रवाल (उपाध्यक्ष), प्रशांत एस अग्रवाल (सचिव), नरेंद्र श्यामसुंदर गोयल (कोषाध्यक्ष), कर्नल नरेश गोयल (सहसचिव), संजय रामजीलाल बन्सल, राहुल आर अग्रवाल, रविकिरण अग्रवाल, राकेश रामचंद्र, अग्रवाल, संदीप अग्रवाल सीए, अरुण कुमार सिंघल, मुकेश कनोडिया, राजेश एस मित्तल, जितेश एन अग्रवाल, जितेंद्र एम बन्सल, योगेश पी जैन, अरविंद आर अग्रवाल, सोमनाथ केडिया यांचा समावेश आहे.

 अध्यक्ष पवनकुमार चमडिया म्हणाले की, मी तुम्हा सर्वांचा सेवक आहे, प्रमुख नाही, मी माझ्या सहकार्‍यांसोबत सांघिक भावनेने काम करणार आहे. कार्यक्रमाच्या मध्यंतरी सभासदत्व घेतलेल्या दोन डझनहून अधिक नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली.

ब्रदरहुड च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय घोडावत यांचे शाल, श्रीफळ देऊन, पुणेरी पगडी घालून व मानचिन्ह देऊन स्नमानित करण्यात आले.  नंतर ब्रदरहुड थीम व्हिडिओ क्लिपचे अनावरण प्रमुख पाहुणे संजय घोडावत आणि अध्यक्ष पवनकुमार चमाडिया यांच्या हस्ते करण्यात आले.  ब्रदरहुड चे मुख्य संस्थापक जय प्रकाशजी गोयल आणि ईश्‍वरचंद गोयल यांना त्यांच्या समर्पण आणि क्लबच्या सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.  पवन बन्सल आणि संजय प्रिन्स, बलबीर अग्रवाल यांनी 2024-2025 च्या सर्व संचालक मंडळांना नाव आणि पदासह जोडीदारांसह मंचावर आमंत्रित केले.  सर्व अधिकारी व सदस्यांनी पदभार स्वीकारला.  कार्यक्रमाला ब्रदरहुडचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश जी गोयल, ईश्‍वरचंद्र गोयल आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पवन कुमार चमाडिया द ब्रदरहुड फाऊंडेशनचे नवे अध्यक्ष  पवन कुमार चमाडिया द ब्रदरहुड फाऊंडेशनचे नवे अध्यक्ष Reviewed by ANN news network on ४/१३/२०२४ ०८:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".