४० लाख ट्रॅक्टर युनिट्सच्या विक्रीतून पार केला मैलाचा दगड
मुंबई : महिंद्रा समूहाचा भाग आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सने मार्च २०२४ मध्ये निर्यातीसह आपल्या ब्रँडच्या ४० लाखाव्या ट्रॅक्टरची विक्री करून एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. महिंद्र ट्रॅक्टर्ससाठीचे महिंद्राचे सर्वात नवीन ट्रॅक्टर सुविधा केंद्र आणि जागतिक उत्पादन केंद्र असलेल्या महिंद्राच्या झहीराबाद केंद्रातून महिंद्राच्या अत्याधुनिक युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित महिंद्रा युवो टेक प्लसने हा मैलाचा दगड पार केला.
महिंद्रा ट्रॅक्टर्सने १९६३ मध्ये यू.एस.च्या इंटरनॅशनल हार्वेस्टर इंक. सह भागीदारीद्वारे पहिला ट्रॅक्टर आणल्यानंतर, २००४ मध्ये १० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर २००९ मध्ये संख्येनुसार जगातील सर्वाधिक विक्री करणारे फार्म ट्रॅक्टर उत्पादक म्हणून नाव कमावले. ९ वर्षांनंतर २०१३ मध्ये, महिंद्राने २० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा गाठला आणि त्यानंतर २०१९ मध्ये ३० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा गाठला. फक्त ५ वर्षांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये, महिंद्रा ट्रॅक्टर्सने दैदीप्यमान कामगिरी करत ४० लाखाव्या ट्रॅक्टरची विक्री केली. संपूर्ण आर्थिक वर्षात, महिंद्रा ट्रॅक्टर ब्रँडने २ लाखांहून अधिक युनिट्सची जोरदार विक्री देखील केली.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “परिवर्तनात्मक शेती आणि जीवन समृद्ध करण्याच्या आमच्या उद्देशाने प्रेरित होऊन आम्हाला ४० लाखावा महिंद्रा ट्रॅक्टर विकताना खूप अभिमान वाटत आहे. याचे कारण गेली अनेक दशके आम्ही या क्षेत्रात अग्रणी असून महिंद्राची ट्रॅक्टरची यशस्वी ६० वर्षेही यंदा साजरी करत आहोत. या सर्व महत्वपूर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मी आम्हाला दररोज प्रेरणा देणाऱ्या आमच्या ग्राहकांचे, शेतकरी, तसेच आमच्या भागीदारांचे आणि आमच्या टीमचे मनापासून आभार मानू इच्छितो. आम्ही सर्वांनीच परिवर्तनाचा प्रवास एकत्रपणे सुरू केला आहे.”
गेल्या६० वर्षांच्या कालावधीत महिंद्राने ३९० पेक्षा जास्त ट्रॅक्टर मॉडेल्सच्या विविध श्रेणींचा समावेश करण्यासाठी आपल्या योजनांचा विस्तार केला आहे. या कालावधीत महिंद्रा ट्रॅक्टर्सनेही संपूर्ण भारतभर १२०० पेक्षा जास्त डीलर भागीदारांचे मजबूत नेटवर्क उभारले आहे. ग्राहक प्रथम दृष्टीकोनामुळे ब्रँडला विक्री, सेवा आणि सुट्या भागांचे अनेकविध स्तर पुरविण्यास सक्षम केले असून महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ४० लाख ग्राहकांचा पाया विस्तारत आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ४० लाख ग्राहकांचे कौतुक करण्यासाठी, कंपनीने ‘४० लाख आनंदी ग्राहक आणि ६० वर्षांचा ब्रँड विश्वास’ हे शीर्षक असलेले नवीन डिजिटल व्हिडिओ कमर्शियल (DVC) सादर केले असून देशभरात आपली उत्पादने आणि सेवांवर नवनवीन ऑफर्स आणत आहे. ही जाहिरात मोहीम समृद्धीचे प्रतीक असलेल्या आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सशी जुळणाऱ्या ‘लाल’ रंगाभोवती फिरते.
सहा खंडांमधील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये आपला ठसा उमटवून यूएस ही महिंद्रा ट्रॅक्टर्सची भारताबाहेरील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नुकतेच ग्लोबल लाइट वेट ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म OJA चे अनावरणझाले. जपानच्या मित्सुबिशी महिंद्रा ॲग्रीकल्चर मशिनरीच्या सहकार्याने महिंद्राने अलीकडेच यू.एस. मध्ये OJA ची विक्री सुरू केली. OJA सह महिंद्रा ट्रॅक्टर्स २०२४ मध्ये थायलंडमध्ये सुरू होणाऱ्या आसियानमध्ये आणि त्यानंतर जागतिक ट्रॅक्टर बाजारात अग्रगण्य ट्रॅक्टर ब्रँड म्हणून महिंद्रा ट्रॅक्टर्सला आपले स्थान मजबूत करण्यास सक्षम करत २०२५ मध्ये युरोप मध्ये पदार्पण करेल.
Reviewed by ANN news network
on
४/१८/२०२४ ०९:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: