दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याच्या गप्पा सांगू नका; थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला

 


जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार

दिलीप शिंदे 

सोयगाव :  अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत तालुक्यातील जरंडी येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली.

    जालना लोकसभेचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती 

काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे---
महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतेरे फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारणात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता... 

यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवणे,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदन पाटील,धृपता सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर पुष्पा काळे यांनी आभार मानले...
दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याच्या गप्पा सांगू नका; थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याच्या गप्पा सांगू नका; थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला Reviewed by ANN news network on ४/२९/२०२४ १०:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".