हरियाणातील मानेसर येथील होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ग्लोबल रिसोर्सेस फॅक्टरीमध्ये सीकेडी इंजिन असेंब्ली लाइनचे उद्घाटन

 


गुरुग्राम : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या भारतातील आघाडीच्या दुचाकी कंपनीला आपल्या प्रवासातील लक्षणीय टप्पा जाहीर करताना आनंद होत आहे. कंपनीने मानेसरगुरुग्राम (हरियाणा) येथील आपल्या ग्लोबल रिसोर्सेस फॅक्टरीमध्ये नव्याअत्याधुनिक इंजिन असेंब्ली लाइनचे उद्घाटन केले. त्यामध्ये सीकेडी (कंप्लिटली नॉक्ड डाउन) निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

नवी असेंब्ली लाइन एचएमएसआयची नाविन्यकार्यक्षमता आणि जागतिक गुणवत्ता यांप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारी आहे. नव्या असेंब्ली लाइनची क्षमता ६०० इंजिन्स प्रती दिवस आहे. या लाइनद्वारे ११० सीसी ते ३०० सीसी क्षमतेची इंजिन्स तयार केली जाणार असून जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील.

एचएमएसआयच्या मानेसर येथील ग्लोबल रिसोर्स फॅक्टरीला कंपनीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. २००१ मध्ये अ‍ॅक्टिव्हा या पहिल्या मास प्रॉडक्शन मॉडेलसाठी स्थापन करण्यात आलेली ही सुविधा देशातील होंडाची पहिली दुचाकी उत्पादन सुविधा आहे. इतक्या वर्षांत या सुविधेचे महत्त्वपूर्ण निर्यात केंद्रात रुपांतर झाले असून जागतिक वाहन उत्पादन क्षेत्रात तिचे महत्त्वाचे स्थान आहे. सध्या एचएमएसआयद्वारे ५८ बाजारपेठांत निर्यात केली जाते. त्यामध्ये युरोपमध्य आणि लॅटिन अमेरिकामध्यपूर्वदक्षिण- पूर्व आशिया, जपानऑस्ट्रेलियान्यूझीलंड आणि सार्क देशांचा समावेश आहे.

याप्रसंदी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालकअध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, मानेसर येथील ग्लोबल रिसोर्स फॅक्टरीमध्ये सीकेडी निर्यातीसाठी नवी इंजिन असेंब्ली लाइन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. ही लाइन या क्षेत्रात सातत्याने नवे तंत्रज्ञान आणण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. नव्या असेंब्ली लाइनच्या मदतीने निर्यातीला चालना देण्याचेबाजारपेठेतील विस्तार नव्या उंचीवर नेण्याचे आणि जागतिक दर्जाचे मापदंड अवलंबण्याचे ध्येय होंडाने ठेवले आहे.

नव्या सीकेडी असेंब्ली लाइनची महत्त्वाची वैशिष्ट्ये -

·   दर्जेदार थीम्सक्रिटिकल टॉर्किंगव्हिजन कॅमेरा इनस्पेक्शन सिस्टीम आणि सुटे भाग व प्रक्रियांच्या संपूर्ण ट्रेसेबिलिटीसाठी डीसी टुल्सचा वापर. इंजिनाच्या आवाजाचे परीक्षण करण्यासाठी खास एक्झॉस्ट कलेक्शन लाइन आणि अकॉस्टिक चेंबरही तयार करण्यात आले आहे.

·   ऑटोमेशन तंत्रज्ञान नवीन सीकेडी इंजिन असेंब्ली लाइनमध्ये टाइटनिंग आणि टॉर्किंगसाठी फ्लायव्हील असेंब्ली ऑटोमेशन यंत्रणा देण्यात आली आहे. त्याशिवाय ऑटोमॅटिक पिस्टन पार्ट्स व्हेरिफिकेशन सिस्टीम आणि छोट्या भागांसाठी इंटरलॉकिंग युनिट देण्यात आले असून त्यामुळे प्रक्रिया दोषमुक्त राहाण्याची काळजी घेतली जाते.

हरियाणातील मानेसर येथील होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ग्लोबल रिसोर्सेस फॅक्टरीमध्ये सीकेडी इंजिन असेंब्ली लाइनचे उद्घाटन हरियाणातील मानेसर येथील होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ग्लोबल रिसोर्सेस फॅक्टरीमध्ये सीकेडी इंजिन असेंब्ली लाइनचे उद्घाटन Reviewed by ANN news network on ४/१८/२०२४ ०९:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".