बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा : जे. पी. नड्डा

 



मोदी यांच्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या!

गोंदियातील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आवाहन

 

गोंदिया : एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र आलेले इंडिया आघाडीचे नेते यातून योग्य निवड करून देशाच्या विकासाची गंगा नव्या वेगाने वाहती राखण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदी बसवू याअसे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी गोंदिया येथील जाहीर सभेत बोलताना केले. ज्यांचे अनेक नेते जेलमध्येआणि अनेकजण बेलवर आहेतअशा भ्रष्टाचाऱ्यांच्या आघाडीला कायमचे घरी बसवाअसेही ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेभंडारा - गोंदिया चे उमेदवार सुनील मेंढे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभेची ही निवडणूक केवळ एका खासदारास विजयी करण्याची निवडणूक नसून दोन विचारधारांची लढाई आहे. विकासाची राजनीतीदेशाच्या उज्जवल भविष्याचा संकल्प आणि देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देणेमोदींना सत्तेवरून हटविणे आणि विकासाला विरोध करत भ्रष्टाचाराची पाठराखण करणे एवढाच घमंडी आघाडीचा अजेंडा आहेअसा स्पष्ट आरोप करीत नड्डा यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा तपशीलवार पाढाच या सभेत वाचला.

मोदी सरकारने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून याआधी केवळ उच्चनीचशहरी-ग्रामीणआणि जातीधर्माच्या नावाने होणाऱ्या राजकारणास हद्दपार केले. मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली असून आता विकासाचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर व सबका साथ सबका विकाससबका प्रयास या नीतीने देशाच्या राजनीतीला नवी दिशा मिळाली आहे.

गावगरीबवंचितपीडितशोषितदलितयुवाकिसानमहिला यांची जेथे काळजी घेतली जातेतेथे विकाससमृद्धी आणि उत्कर्ष साधला जातो. मोदीजींच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात गावागावात पक्के रस्ते झालेवीज पोहोचली. देशातील अडीच कोटी घरे मोदी यांच्या सौभाग्य योजनेमुळे विजेने उजळलीआज देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळते. 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून मुक्त झालीही भारताची समृद्धी आहे. काँग्रेसच्या काळात गरीब महिलांना जळणासाठी लाकडे गोळा करण्याकरिता पायपीट करावी लागायचीचुलीच्या धूरात गुदमरण्याची वेळ यायचीआज दहा कोटी भगिनींना उज्ज्वला योजनेतून गॅस जोडण्या देऊन मोदी यांनी भगिनींची या त्रासातून मुक्तता केली आहे.

2014 पूर्वीच्या भारतातग्रामीण भागांतील महिलांना सूर्योदयापूर्वी आणि रात्रीनैसर्गिक विधींसाठी घराबाहेर जावे लागायचे. महिलांची प्रतिष्ठा पणाला लावणारे हे लाजीरवाणे प्रकार बंद करण्यासाठी मोदीजींनी घरोघरी स्वच्छतागृहे दिली आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केलाअसे ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखांचे विमा कवच देऊन मोदी यांनी 55 कोटी लोकांच्या आयुष्याला सुरक्षितता दिली. महामार्गरेल्वेविमानसेवांचे जाळे या देशाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा आज सर्वत्र उमटल्या असून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर येत्या पाच वर्षांत देशातील सर्व रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची होऊन देशाचा संपूर्ण कायापालट झालेला दिसेलअशी ग्वाही देखील नड्डा यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज हे मोदींचे स्वप्न आहे. विकासाची ही गंगा अशीच निरंतर राहावीयासाठी मोदी सरकारला पुन्हा सत्ता द्याकारण मोदी आणि विकास ही अविभाज्य अंगे आहेत. जिथे मोदी तिथे विकास हे समीकरण झाले आहे. एकीकडे भ्रष्टाचार हटाओ म्हणणारे मोदीजीआणि भ्रष्टाचारियो को बचाओ म्हणत एकत्र आलेले इंडी आघाडीतील पक्षयातून  भ्रष्टाचार हटविणाऱ्यास निवडायचेकि भ्रष्टाचाऱ्यांना निवडायचेयाचा निर्णय करण्याची वेळ आली आहेअसे सांगत नड्डा यांनी इंडी आघाडीच्या नेत्यांवरील घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संपूर्ण पाढा वाचला. राहुल गांधीसोनिया गांधीपी.चिदम्बरमलालूप्रसाद यादवतेजस्वी यादवतेजप्रताप यादवतसेच अनेक द्रमुक नेतेतृणमूलचे नेते जामिनावर (बेल) बाहेर आहेततर अरविंद केजरीवालसत्येंद्र जैनमनीष सिसोदियाडीएमके मंत्री जेलमध्ये आहेत. ज्यांचे अर्धे नेते बेलवर आणि अर्धे नेते जेलमध्येअशा भ्रष्ट आघाडीला घरी बसवाअसे आवाहन त्यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

 

ग्यान ही विकासाची परिभाषा!

मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळेसर्व समाजघटकांच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. सर्व समाजातील सर्व स्तरांच्या उत्कर्षाची राजनीती देशात सुरू झाली असूनग्यान हे विकासाचे सूत्र बनले आहे. ग्यान या शब्दातील जी म्हणजे गरीबवाय म्हणजे युवाए म्हणजे अन्नदाता व एन म्हणजे नारीशक्तीही मोदींच्या राजनीतीची चतु:सूत्री आहेअसे नड्डा म्हणाले.

बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा : जे. पी. नड्डा बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा : जे. पी. नड्डा Reviewed by ANN news network on ४/१३/२०२४ ०८:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".