उरण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरीे

 


विठ्ठल ममताबादे

उरण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२४ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे अध्यक्ष संजय गायकवाड, आमदार महेश बालदी, उरण मुख्याधिकारी समीर जाधव, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, मोरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक इंगोले, कामगार नेते रमेश ठाकूर , कौशिक शाह, रवी भोईर, जैवीन कोळी, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे कामगार नेते संतोष घरत, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या भावना घाणेकर,  चिंतामण गायकवाड, सीमा घरत, यशवंत ठाकूर, रोहित पाटील, अमृत शेठ, भूपेन घरत, नंदकुमार पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , धनेश बोरे मनसे, उरण तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष घनःश्याम कडू , जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो तसेच दि उरण तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड विजय पाटील, ज्येष्ठ अधिवक्ता आणि माजी अध्यक्ष ॲड पराग म्हात्रे, खजिनदार ॲड अर्चना माळी, सदस्य ॲड प्रतिभा भालेराव, ॲड स्वाती कांबळे, ॲड निकिता कासारे, ॲड रेखा पाटील,ॲड श्रीधर कवडे, ॲड निवेदिता वाघमारे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेली मिरवणूक सिद्धार्थनगर बौद्धवाडा मोरा येथून उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे आली. तेथे मिरवणुकीतील सहभागी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सिद्धार्थनगर मोरा, संघर्षनगर भवरा, मांगीरदेव, बौद्धवाडा, चारफाटा, एनजीएल गेट भीम नगर, सावित्री बाई फुले, नाईक नगर परिसर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरीे उरण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरीे Reviewed by ANN news network on ४/१४/२०२४ ०८:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".