महासाधू मोरया गोसावींचा आशीर्वाद घेऊन संजोग वाघेरे पाटील यांचा चिंचवडमध्ये प्रचार !

 


पिंपरी  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज गुरुवारी (दि. 4 एप्रिल) सायंकाळी 4 वाजता चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरातून दर्शन घेतले.  मोरया गोसावींच्या समाधी मंदिरात आशिर्वाद घेऊन त्यांनी चिंचवडमध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार केला.

या दौ-याप्रसंगी स्वराज इंडियाचे अध्यक्ष मानव कांबळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, सागर चिंचवडे, ज्योती निंबाळकर, राहुल भोईर, निखील भोईर, सागर वाघेरे,  कविता कोंडे देशमुख, पंचशीला आगळे, नम्रता काळभोर,  गौरव चौधरी, संजय पडवळ, सलीम शेख, वैशाली काटकर,  अनिता तुतारे, रजनी वाघ, उषाताई अल्हाट, कलावती नानेकर, नाना सोनार, समन्वयक गणेश आहेर, रमेश वाळुंज, बाळासाहेब पडवळ, विभाग प्रमुख सचिन चिंचवडे, संदीप भालके, राजाराम कुदळे, दत्तात्रय चिंचवडे, नंदकुमार डेरे, प्रशांत खुळे, विलास भोईर, बिपिन नानेकर, दिलीप गोते पाटील, प्रकाश येवला, संजय लंके, संभा दौंडकर, राहुल वाघेरे, महेश वाघेरे, दीपक वाघेरे, राम दातीर पाटील, अमोल नानेकर, अमित बोत्रे, प्रणव साखरे, बाळासाहेब वाघेरे, सुभाष वाघेरे, चिंचवड गावातील गोविंदा ग्रुपचे कार्यकर्ते, निखिल भोईर, राहुल भोईर, प्रशांत वाघेरे, अभिजित भापारी, सागर वाघेरे, गणेश वाघेरे, आकाश वाघेरे, प्रवीण माळवी, सुशांत गुजर, केतन जाचक, रामचंद्र पवार, सुरज वाघेरे, अनिकेत वाघेरे, रोहन वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वेंकी शिंदे यांच्यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचवड गावातील मंगलमुर्ती वाढा मंदिरापासून दर्शन घेऊन सुरु सुरू झालेला गावभेट दौराकाळभैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, गांधीपेठ, भाजी मंडई, पडवळ आळी आणि सुखकर्ता अपार्टमेंट या ठिकाणी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदारांच्या गाठी-भेटी, प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी आपुलकीने संवाद साधला. निघालेल्या या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून संजोग वाघेरे पाटलांचे औक्षण केले जात होते. फटाक्यांची आतषबाजी अन ढोल ताशांच्या गजराने परिसर दणाणून जात होता. संपूर्ण चिंचवड गावातील परिसर भगव्या झेंड्यानी बहरून गेला होता.

महासाधू मोरया गोसावींचा आशीर्वाद घेऊन संजोग वाघेरे पाटील यांचा चिंचवडमध्ये प्रचार ! महासाधू मोरया गोसावींचा आशीर्वाद घेऊन संजोग वाघेरे पाटील यांचा चिंचवडमध्ये प्रचार ! Reviewed by ANN news network on ४/०४/२०२४ ०९:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".