यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

 


 गिर्यारोहक, गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू, क्रीडापटूंचा स्नेहमेळावा

 मेळाव्यातून यशाचे ‘शिखर’ गाठण्याचा निर्धार

पुणे : ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला प्रेरणा मिळते. पण या मेळाव्यात येऊन निसर्ग संपन्न पुण्याची नव्याने ओळख मला या निसर्गप्रेमींकडून झाली आहे. या मेळाव्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही सगळे साथ द्या. कारण इथे येऊन निसर्वप्रमींची जी साथ मला मिळाली आहे. ती मला यशाचे शिखऱ गाठण्यासाठी उर्जा देणारी आहे असे भाजप– शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी येथे सांगितले.

सिंहगड परिवार फाउंडेशन, नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान, गरुडझेप आणि झेप गिर्यारोहण संस्था अशा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने गिर्यारोहक, गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू, क्रीडापटूंच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोहोळ बोलत होते. यावेळी मोहोळ यांचा गिर्यारोहकांच्या वतीने अनोखे स्वागत करण्यात आले. यावेळी गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेशजी झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक सुनिताताई नाडगीर,  पाच ग्रिनीज रेकॉर्ड होल्डर प्रीती मस्के, निरूमा भावे, डॉ नंदकिशोर मते, सुरेंद्र दुग्गड, लहु उघडे, हर्षल राव, मोहन ओगले, विकास करवंदे, नारायण बतुल, प्रकाश केदारी, सौरभ करडे, मारुती आबा गोळे यांच्यासह सर्व गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू आणि क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘मी स्वत: खेळाडू असल्याने खेळामुळे मानसिक आणि शारिरीक जडणघडण कशी होते?, ते मी अनुभवलं आहे. आता आमच्यावेळच्या खेळात साहसी खेळांचीही भर पडली आहे. इथे सह्याद्रीपासून एव्हरेस्टपर्यंत झेप घेणारे अनेकजण मला दिसत आहेत. यापुढे साहसी खेळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल याबद्दल विश्वास बाळगा’.

या जोखमीच्या क्षेत्रात वावरतांना अनेक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या या सगळ्या धाडसीवीरांना मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खेळाडूंच्यावतीने पुणे शहर हे निसर्गाशी जवळीक साधणारे शहर असून येथे गेल्या काही वर्षात साहसी खेळांची आवड तरूणांच्यात वाढत आहे. पुणे हे सह्याद्रीच्या कुशीत असल्याने येथे साहसी खेळांच्या सुविधा वाढवल्या तर त्याचा फायदा निसर्ग पर्यटनाला होऊ शकतो. दुर्गप्रेमींनी राज्यातील सर्व किल्यांवर प्लास्टिक वापराला बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली.

यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ Reviewed by ANN news network on ४/१३/२०२४ ०२:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".