पुणे : पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र येरवडा संस्थेच्या परिसरात पडझड झालेल्या शासकीय निवासस्थानामध्ये दारु पिऊन गोंधळ घालून पळून गेल्याप्रकरणी तीन अनोळखी युवकांविरुद्ध प्रथम खबर अहवाल नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संस्थेला 1 एप्रिल रोजी महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहूल मोरे, विभागीय उपायुक्त संजय माने तसेच श्रीमती रंधवे यांनी भेट दिली. त्यावेळी संस्थेच्या बाजूला पडझड झालेल्या शासकीय निवासस्थानाची पाहणी करण्याकरिता गेले असता तेथे तीन अनोळखी युवक दारु पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळून आले. त्यांना विचारणा करण्यापूर्वीच ते पळून गेले. त्या अनुषंगाने संस्थेचे जमादार शिमोन साबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दिली आहे, असेही श्रीमती रंधवे यांनी कळविले आहे.
Reviewed by ANN news network
on
४/०२/२०२४ ११:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: