दिलीप शिंदे
सोयगाव : दोन दुचाकीचा समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले असून दोन गंभीर जखमी झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील वरठाण तिडका रस्त्यावर दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुनिल विक्रम बागुल (वय ३३) रा.वाडीसुतांडा ता.सोयगाव व काशीनाथ विठ्ठल पाटील (वय ३२) रा.पिंप्रि ता.पाचोरा अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील काशीनाथ पाटील व राहुल पाटील हे दोघे एम एच १९ इ च ९८११ प्लेटीना गाडीवर पिंप्रि येथुन कींन्ही येथे जात होते तर सोयगाव तालुक्यातील वाडीसुतांडा येथील सुनिल बागुल व सतीश मोरे हे दोघे एम एच १९ बी डब्लू ८५४२ डीस्कवर गाडीवर वाडी येथुन तिडका गावाकडे जात असताना वरठाण तिडका रस्त्यावर दोघांची समोरासमोर जोरदार धडक होऊन सुनिल विक्रम बागुल (वय ३३)रा.वाडीसुतांडा व काशीनाथ विठ्ठल पाटील (वय ३२ )रा.पिंप्रि हे जागीच ठार झाले असून राहुल त्र्यंबक पाटील रा पिंप्रिं सतीश सखाराम मोरे रा वाडीसुतांडा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर,विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर यांनी जावुन ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकी अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची वार्ता परीसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता ह्या घटनेतील मयत पिप्रि येथील काशीनाथ पाटील यांचे एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.
....वेळेवर रुग्णवाहिका मिळेनादरम्यान ह्या दुचाकी अपघातात दोन जागीच ठार तर दोन जखमी झाले असताना बनोटी प्राथमिक आरोग्य केद्राची रुग्णवाहिका चालकास फोन केला असता रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.रुग्णवाहिका मिळत नसल्याने अखेर चाळीस मिनिटांच्या कालावधी नंतर घटनास्थळावरून एका खाजगी वाहनाने जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले तर मृतांना महेंद्रा पिकअप या वाहनाने शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोयगाव तालुक्यातील वरठाण तिडका रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक, दोन ठार...
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ १०:०५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ १०:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: