पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात भारताच्या अनेक धोरणात महत्वाचे बदल : एस. जयशंकर

 


पुणे : देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ’जर्नी ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’  १२ एप्रिल रोजी सायंकाळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे व्याख्यान झाले.

या व्याख्यानात जयशंकर यांनी भारत- अमेरिका, भारत -चीन, भारत- पाकिस्तान यांच्यांतील राजनैतिक संबंध. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यात झालेले महत्वाचे बदल यावर प्रकाश टाकला.

अमेरीकेशी वाढते मैत्रीपूर्ण संबंध नजिकच्या काळात अधिक दृढ होण्याच्या शक्यतेवर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर चीनबाबत वास्तववादी, व्यवहार्य धोरण स्वीकारण्यात आल्याचा उल्लेख करत पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींना भारत आता जुमानत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय संस्कृती, वारसा यांचा मागील सरकारांच्या काळात जणू विसरच पदला होता. मोदींच्या सत्ताकाळात देशातील जनतेला याबद्दल आत्मभान आले. हो मोठी उपलब्धी मानावी लागेल असे सांगत जयशंकर म्हणाले की, आता”इंडिया’पेक्षा ’ भारत’ ही विचारधारा नागरिक स्विकारू लागले आहेत. विद्न्यान, तंत्रद्न्यान यामध्ये वेगाने प्रगती चालू आहे.

शिक्षण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांवर मोठा खर्च होतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्याने बनविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आपल्या विद्यापीठांना बाहेर जाण्याची संधी आहे. परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठांनी पदवी देण्यास सुरूवात केल्यास खर्चात कपात होईल. शिवाय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होईल.

समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार डॉ मेघा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, युवा स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय चौथाईवाले यांनी मुलाखत घेतली.


पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात भारताच्या अनेक धोरणात महत्वाचे बदल : एस. जयशंकर पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात भारताच्या अनेक धोरणात महत्वाचे बदल : एस. जयशंकर Reviewed by ANN news network on ४/१३/२०२४ ०८:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".