लाचखोरीच्या प्रकरणात फ़रार असलेल्या मंडलाधिकार्‍यासाठी लाच मागणार्‍यावर गुन्हा दाखल

 


पुणे : थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणार्‍या व्यक्तीवर अ‍ॅन्टीकरप्शन खात्याने १ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून त्या फ़रार आहेत. या प्रकरणी एका ६५ वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे.

कवडे यांच्यावर अ‍ॅन्टीकरप्शन खात्याने यापूर्वी गुन्हा दाखल केलेला असल्याने त्या फरार आहेत.त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी लाच मागणार्‍या व्यक्तीचे नाव विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे असून १३ मार्च रोजी नाईकनवरे याच्यासह अन्य एकाला जयश्री कवडे यांच्यासाठी लाच स्वीकारताना अ‍ॅन्टीकरप्शनच्या पथकाने पकडले होते. आता नाईकनवरेवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे.

अ‍ॅन्टीकरप्शनकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे.  तक्रारदाराने कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजूर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे याने ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने अ‍ॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता,त्यात तत्थ्य आढळल्याने विजय नाईकनवरे याच्यावर दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

लाचखोरीच्या प्रकरणात फ़रार असलेल्या मंडलाधिकार्‍यासाठी लाच मागणार्‍यावर गुन्हा दाखल लाचखोरीच्या प्रकरणात फ़रार असलेल्या मंडलाधिकार्‍यासाठी लाच मागणार्‍यावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ४/०१/२०२४ ०८:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".