तेजस्विनी शेवते- उ-हे यांना पीएच.डी प्रदान

 

 
पिंपरी :  वाकड येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडिज या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या  तेजस्विनी शेवते-उ-हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून "बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन" या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी पी.एचडी. प्रदान करण्यात आली आहे.
 
प्राध्यापिका तेजस्विनी शेवते- उ-हे यांनी श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती,पुणे येथील संशोधन केंद्रातून  "अँन अन्यालिटिकल स्टडी ऑफ इम्प्लिकेशन्स ऑफ  एक्समपशन्स अँड डीडकशन्स अंडर इनकम टॅक्स ऍक्ट टू सॅलरीड असेंसीज " ("An Analytical study of Implications of Exemptions & Deduction under Incom Tax Act to salaried Assessees" )या विषयावर संशोधन केले आहे.त्यांना डॉ. स्मिता पांडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.तसेच डॉ. यशोधन मिठारे डीन  कॉमर्स & मॅनेजमेंट पुणे विद्यापीठ , डॉ. अतिश चिंतामणी (पुम्बा), डॉ. श्यामला  वाणिज्य विभाग पुणे विद्यापीठ  यांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन  केले.तसेचच सासरे बाळासाहेब उऱ्हे व पती सुमीत उऱ्हे यांनी ही तेजस्वीनी यांना प्रोत्साहन दिले.
 
त्यांच्या या यशामध्ये  उ-हे परिवार आणि शेवते परिवाराचा मोठा वाटा असल्याचे प्रा. तेजस्विनी शेवते-उ-हे यांनी सांगितले.
तेजस्विनी शेवते- उ-हे यांना पीएच.डी प्रदान तेजस्विनी शेवते- उ-हे यांना पीएच.डी प्रदान Reviewed by ANN news network on ४/१९/२०२४ ११:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".