पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट १ ने बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे तयार करून देणा-या एकाला अटक करण्यात यश मिळविले आहे.
गणेश संजय कुंजकर वय २४ वर्षे रा. बेघरवस्ती, मु.पो. भुईंज ता. वाई जि. सातारा असे पकडण्यात
आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सुलभ कॉलनी, राहटणी, पुणे येथे एका खोलीतून त्याचा हा बेकायदा उद्योग
चालवीत होता.
गुन्हेशाखा युनिट १ चे
उपनिरीक्षक शिवाजी कानडे यांना आरोपी बनावट पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तयार करून देत
असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरीष्ठ निरीक्षक, गोरख कुंभार, शिवाजी कानडे, अंमलदार मनोजकुमार कमले, बाळु कोकाटे, विशाल भोईर यांनी आरोपीच्या खोलीवर छापा घातला. आणि,
आरोपीला बनावट प्रमाणपत्रे तयार करताना पकडले.
आरोपीकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि ५१ बनावट प्रमाणपत्रे असा ४०
हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी
वाकद पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, अंमलदार मनोजकुमार कमले, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, स्वप्निल महाले, विशाल भोईर, मारोती जायभाये, अजित रुपनवर, तानाजी पानसरे यांनी केली.
बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणारा जेरबंद!
Reviewed by ANN news network
on
४/११/२०२४ ०४:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: