भिवंडी; निजामपुरा पोलिसांची कामगिरी
ठाणे
: ठाणे शहर पोलिसांच्या अखत्यारीतील भिवंडी निजामपुरा पोलीसठाण्याच्या पथकाने दरोडा
घालण्याच्या तयारीत थांबलेल्या एका टोळीतील तिघांना भिवंडी येथे अट्क केली आहे.
दोघे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू
आहे. ९ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
तळवली
नाका ते कांबा रोडवर तळ्याच्या शेजारी, भिवंडी येथे एका रिक्षात पाचजण बसके असून
ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी तेथे
जाऊन नईम जमाल अहमद सयद, वय 19 वर्षे, रा. नागाव रोड, भिवंडी, सुफियान भद्रेआलम अन्सारी, वय 19 वर्षे, रा. नागाव रोड, भिवंडी, सोहेल सनाउल्ला शेख, वय 26 वर्षे, रा.चव्हाण कॉलनी, भिवंडी यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे दोन
साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिसांनी ताब्यात
घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता ते या परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत
असल्याची कबुली त्यांनी दिली.
आरोपींकडून ऑटो रिक्षा क्र. MH 04-KX-7163, एक रिव्हॉल्वर, एक जिवंत राउंड, मिरचीपूड, एक एअर गन, एक लोखंडी फायटर, एक चा्कू, नायलॉनची दोरी, एक लोखंडी रॉड, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींविरुध्द 1462/2024 क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम 399,402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमित गिते करत आहेत.
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघे अटकेत; दोघे पसार
Reviewed by ANN news network
on
४/११/२०२४ ०४:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: