दिलीप शिंदे
सोयगाव : तालुक्यातील कंकराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक महेश गवांदे यांची बदली झाल्याने दि.१६ मंगळवारी कंकराळा येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेत निरोप समारंभाचे आयोजन केले होते.
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंकराळ्याच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका हिवराळे तर दादाराव फुसे गटशिक्षणाधिकारी,फिरोज तडवी केंद्रप्रमुख सोयगाव, जी. आर.पाटील केंद्रप्रमुख जरंडी,किरण पाटील शिक्षक भारती तालुकाध्यक्ष सोयगाव, नरेंद्र बारी मुख्याध्यापक माळेगाव, डोंगरसिंग राजपूत मुख्याध्यापक न्हावितांडा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
दरम्यान महेश गवांदे हे शिक्षक सन २०११ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंकराळा येथे कर्तव्यावर रुजू झाले. सन २०२४ मध्ये त्यांची बदली राणीचे बांबरुड ता.पाचोरा याठिकाणी झाली. तब्बल तेरा वर्षे कंकराळा येथे शिक्षक म्हणून त्यांनी सेवा दिली. गावातील विद्यार्थ्यांना योग्य संस्काराचे मार्गदर्शन करीत या तेरा वर्षात अनेक विद्यार्थी घडविले.या तेरा वर्षाच्या कालावधीत शिक्षकांची गावकऱ्यांशी नाळ जुळली. गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत महेश गवांदे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मोतीलाल घुसिंगे, ईश्वर क्षीरसागर, रवी पाटील,दिलीप मचे,किरण पाटील,आकाश पाटील,कोमल पाटील,प्रदीप कदम,भागवत पाटील,दिलीप मचे,चंद्रकांत परदेशी,प्रताप उबाळे,मोतीलाल वाघ,जितू भावसार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.प्राथमिक शाळा कंकराळा येथून बदली झालेल्या शिक्षकास गावकऱ्यांकडून निरोप...
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०२:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२४ ०२:२६:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: