सोयगाव तालुक्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये १० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला
अवैध धंद्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याची नागरिकांमध्ये चर्चा...
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील आमखेडा व कंकराळा गावातील कुलूपबंद घरांना टार्गेट करून कुलूप तोंडून चार तोळे तीन ग्रॅम सोन्यासह दहा लाख ६६ हजार रु रोकड लांबविल्याची घटना दि.१४ रविवारी भरदिवसा दुपारी एक ते चार वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते रात्री नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर वरून सोयगावातील आमखेडा व कंकराळा गावात श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते या धाडसी घरफोड्या च्या घटनेमुळे सोयगावात खळबळ उडाली आहे.
बनोटी दुरक्षेत्र अंतर्गत गावात अवैधधंदे सर्रास सुरू आहेत. अवैध धंदे बंद करण्यात एकाही पोलीस अधिकऱ्याला यश आलेले नाही.अवैध धंद्यांचे माहेरघर बनलेल्या दुरक्षेत्र बनोटी अंतर्गत गेल्या काही दिवसांपुर्वी वरठाण येथील अशोक सोळंके याचे रात्रीच्या वेळी घर फोडले होते तर एकाच दिवशी भरदिवसा पहुरी येथील वसंत मगर यांच्या घरी चोरी झाली होती त्यानंतर तिडका येथील दिलीप बाबंर्डे यांच्या घरी देखील चोरी झाली. दि.०३ एप्रिल रोजी सुरेखा महाजन यांच्या घरी चोरी झाली. सोयगाव पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सोयगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तालुक्यातील कंकराळा गावात रस्त्याच्या लगत असलेल्या आत्माराम मनीराम गायकवाड(वय ४५) यांचे कटुंब काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेले होते.त्यांच्या घरांचे कुलूपबंद तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील टरबूज विक्री व कापूस विक्रीतून कमावलेले सात लाख ८० हजार रु रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली तर आमखेडा येथील रामकृष्णनगर भागातील विजय नरोटे व छायाबाई बोडखे या दोघांची घरे कुलूपबंद असल्याचे पाहून त्या दोन्ही घरांची दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून विजय नरोटे यांच्या घरातील दोन लाख ६१ हजार रु चे चार तोळे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने व छायाबाई बोडखे यांच्या कुलूपबंद घरातील रोख रक्कम २५ हजार रु लांबविली आहे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वाहनाने सोयगावात दाखल होऊन सर्वात आधी शहराला लागून असलेल्या आमखेडाच्या रामकृष्णनगर मध्ये घरफोडी करून याच रस्त्यावर पुढे कंकराळा गावात आत्माराम गायकवाड यांचे कुलुप बंद असलेल्या घर फोडून सात लाख ८० हजार रु ची रोख रक्कम लांबविली आहे.
दरम्यान हे अज्ञात चोरटे हे दुचाकी वर असल्याचे बोलले जात आहे याप्रकरणी रात्री नऊ ते दहा वाजता छत्रपती संभाजीनगर वरून पाचारण करण्यात आलेल्या श्वान पथकांनी तिन्ही ठिकाणी चोरट्यांचा मागोवा घेतला.श्वान पथकाचे उपनिरीक्षक मिलिंद कुलकर्णी, नासेर पठाण, दीपक खिंजूरडे आदींनी कंकराळा व आमखेडा भागात तासभर श्वान जुलियाच्या मदतीने मागोवा घेतला दरम्यान आत्माराम गायकवाड(रा कंकराळा) विजय नरोटे व छायाबाई बोडखे दोघे( रा रामकृष्ण नगर आमखेडा) या तिघांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रात्री अकरा वाजता पाच ते सहा चोरट्यांचा विरुद्ध घरफोडी सह विविध कलमा खाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कुमार कोल्हे यांनी घटनास्थळी भेट दिली होती पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश बडे राजू बर्डे, दिलीप पवार, रविंद्र तायडे, अजय कोळी, संजय सिंघम व विनोद सपकाळ आदी तपास करत आहेत.
दरम्यान सोयगाव शहरासह परिसरात जुगाराचे अड्डे असून ते बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण केले होते. मात्र पोलिसांना अवैधधंदे बंद करण्यात अपयश आले आहे. अवैधधंदे सुरू असल्याने सोयगाव पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडीचा वाढता आलेख असून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रामकृष्णनगर येथे ज्या ठिकाणी घरफोडी झाली त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर जुगाराचा अड्डा असल्याने याठिकाणी जुगार खेळण्यास येत असलेले जुगारीची नेहमी वर्दळ असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा रामकृष्णनगर येथील नागरिकांमध्ये सुरू होती.शहराच्या चारही बाजूला सुरू असलेले जुगाराचे अड्डे कोण बंद करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. जुगार अड्ड्याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोयगाव तालुक्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये १० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ ०९:५३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१५/२०२४ ०९:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: