१३ मुलांची बालगृहात रवानगी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पोलीस कक्षाने लहान मुलांना भीक मागायला लावणार्या ४ महिलांना अटक करून त्यांच्या तावडीतून १३ अल्पवयीन मुलांची सुटका केली.
बांगूरनगर पोलीसठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मीठ चौकी जंक्शन, मढ मार्वे रस्ता, मालाड पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी लहान मुले भीक मागत असून चार महिला त्यांना हे करावयास भाग पाडत आहेत अशी माहिती विशेष बाल पोलीस कक्षाला मिळाली होती.पोलिसांनी ४ एप्रिल रोजी तेथे कारवाई केली.
मुलांना भीक मागायला लावणार्या ४ महिलांविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात २६९/२०२४ क्रमांकाने बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २००० कलम २४ सह भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा १९५९ कलम ५,९,११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली.
तर मुलांना मानखुर्द येथील बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. समितीने दिलेल्या आदेशाप्रमाणे या मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर,विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त, गुन्हे, शशिकुमार मीना, उपआयुक्त, अंमलबजावणी रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन पोतदार, निरीक्षक अनिता कदम, सहाय्यक निरीक्षक संगिता पाटील, शिपाई भोसले, तळेकर, बागल, बुधे, सोनकांबळे, विशेष बाल पोलीस युनिट उपनिरीक्षक नंदकुमार कदम, सहायक फौजदार कदम, मालवणकर,हवालदार जेडगुळे, रश्मी हळर्णकर, वाघमारे, शिपाई बेलोसे, दराडे, हवालदार गोडसे, शिपाई मोरे, घुगे, यादव,शिंदे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
४/१४/२०२४ ०२:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: