माणगाव : माणगावनजिक तिलोरे पेट्रोलपंपाजवळ असलेल्या मानस हॉटेलच्याजवळ ७ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ठाण्याकडून दापोलीकडे जाणारी शिवशाही एसटी आणि माणगावकडून मुंबईच्या दिशेने जाणारी रिक्षा यांच्या धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण अनंत मालुसरे वय वर्ष 55 रा.रु नं 602 इंद्रचनू पॅलेस हाउसिंग सोसायटी, जोगीला मार्केट जवळ, उदलघर, ठाणे, (रिक्षाचालक), दत्तात्रय नारायण वर्धेकर वय वर्ष 56 रा संतोषीमाता मंदिर, टी एम सी डेपो, आनंदवन, गावदेवी, शिवाजी पार्क पोलीस, नौपाडा, ठाणे व तिसऱ्याचे नाव कळू शकले नाही या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस क्रमांक एम एच 09 एफ एल 0246 ठाण्याहून दापोलीकडे येत होती. तर रिक्षा क्रमांक एम एच 04 एफ सि 6282 माण्गावकडून मुंबईच्या दिशेने चालली होती.मानस हॉटेलशेजारी रिक्षाने शिवशाहीला धडक दिली. ही धडक एव्हढी जोरात होती की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चेपला आहे.
अपघाताचे वृत्त कळताच माणगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: