माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे! जे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे!! : अतुल पेठे

 


मुंबई : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव ऍड फिजच्या 'चैत्र चाहूल'द्वारे विनोद आणि महेंद्र पवारांनी सोळा वर्षे ही समृद्ध परंपरा जपत १७ वे 'ध्यास सन्मानवर्षे नुकतेच साजरे केले. जेष्ठ प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांना जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव जोशी यांच्या हस्ते आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जेष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते आणि विनायक गवांदे व डॉ. नीना सावंत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यापूर्वी अरुण काकडेसंजना कपूरमाधुरी पुरंदरेकांचन सोनटक्केअरुण होर्णेकरचंद्रकांत काळेप्रदीप मुळ्ये अशा अनेक मान्यवरांना ध्यास सन्मान मिळाला आहे.

पाण्याने भरलेलं तळ पाहिल्यानंतर नैसर्गिकरित्या माणसाला जितका आनंद होतो तितकाच आनंद मला प्रेक्षकांनी भरलेलं नाट्यगृह पाहिल्यावर होतो.  नाट्यगृह किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच! रामानंद  शाहिरांनी आत्माराम पाटलांचं जे गीत गायलं त्यामध्ये त्यांनी मनुष्याच्या जाती म्हणजे काययाविषयी सांगितलं. खरं तर इतका दणकट कार्यक्रम झाल्यानंतर अजूनही आपण त्या भावनांनी उद्रेक झालेल्या किंवा भावनोद्दिपीत झालेल्या अवस्थेत आहोत. मी मात्र जरा शांतच बोलणार आहे. कारण प्रायोगिक नाटक म्हणजे आधी नाटकमग प्रायोगिक नाटक आणि त्यातला अधिक प्रायोगिक नाटक म्हणजेच ‘A minority within a minority’ म्हणजेच अल्पसंख्यांक मधला अल्पसंख्यांक असं आमचं नाटक असेल. कारण प्रायोगिक नाटक काहीतरी वेगळं असतंते अधिक कश्याचा तरी खोल वेध घेत असतं. चैत्र चाहूल या कार्यक्रमातील 'ध्यास सन्माना'चे मानकरी प्रख्यात प्रयोगशील नाटककारअभिनेते निर्माते अतुल पेठे बोलत होते”. या सोहळ्यात त्यांचा प्रयोगशील रंगकर्मी म्हणून तर लोककलावंतअभ्यासक आणि संगीतकार मनोहर गोलांबरे मनोहर गोलांबरे यांचा 'ध्यास सन्मानपुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सविस्तर बोलताना पेठे म्हणाले, "रामानंद शाहिरांनी जे गीत गायले ते इतकं महत्त्वाचं आहेत्यांनी वर्णन केलेल्या मनुष्याच्या १०८ जाती ऐकताएका अर्थाने ते माणसांचे केलेले १०८ भेद आहेत. म्हणजे ब्राह्मण आहेसाळी आहेकोष्टी आहेमाळी आहे, ... आलाना आहे, ...फलाना आहे. पण खरी जात ही आहे की माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजेजे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे. हेच सांगण्याचा हेतू आहेफक्त परंपरा म्हणजे नुसतं दणादणा वाजवून आपलं भावनांनी उद्दीपित होणं नव्हेत्या परंपरांमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. त्याच परंपरा राहतात आणि ज्याला परंपरा माहित आहेत तोच नवतेचा वेध घेऊ शकतो. आमचं नाटक या नवतेचा शोध घेणारं आहे. "ध्यास सन्मान" ज्यांना ज्यांना मिळाले आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात नावीन्य आणले आहे."

लोककलावंतअभ्यासक आणि संगीतकार मनोहर गोलांबरे यांनाही हा पुरस्कार मिळाला. त्यांनी शाहीर आत्माराम पाटील यांचे कवन गायले. त्यामुळे आपली भाषिक आणि राजकीय समृध्द परंपरा समोर आली. कार्यक्रमात सुरुवातीला जालन्याचे शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणीहा लोकसंगीताचा दणकट कार्यक्रम सादर झाला. रामानंद यांची गायनातील ऊर्जा आणि त्यासोबत त्यांचा चफकल अभिनय रसिक प्रेक्षकांना मोहित करणारा होता.

या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक अरुण होर्णेकरशफाअत खानप्रदीप मुळ्येनिळू दामलेश्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराईरघुनंदन गोखलेप्रमोद पवारमुकुंद टाकसाळेअवधूत परळकररोहिणी गोविलकरअरुण कदमविजयदादा चव्हाणजयप्रकाश लब्देश्याम शिंदे आणि अनेक रंगकर्मी यांची उपस्थिती होती.

माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे! जे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे!! : अतुल पेठे माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे! जे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे!! : अतुल पेठे Reviewed by ANN news network on ४/११/२०२४ ०७:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".