बिजलीनगर, चिंचवड परिसरात संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रतिसाद !

 


पिंपरी :  गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार आता सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. आज सोमवारी (दि. 8) सकाळी झालेल्या वाल्हेकरवाडी - रावेत गावभेट दौऱ्यात ते मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला. या वेळी सेल्फीहस्तांदोलन अन शुभेच्छांनी गावभेटी दौऱ्याचा उत्साह वाढला होता.

 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते माधव पाटीलसागर चिंचवडेगणेश भोंडवेकामगार आघाडीचे संदीप शिंदेराहुल धनवेआम आदमी पार्टीचे शहर संघटक सचिन पवारकमलेश रनावरेवैजनाथ शिरसाठरोहित सरनोबतभरत दासदगडूछ मरळेमाथाडी कामगार संघटनेचे हनुमंत तरडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थपदाधिकारीयुवा कार्यकर्तेज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वाघेरे पाटील म्हणाले कीतरुणांना नोक-या नाहीत आजचा तरुण बेरोजगार झाला आहे. देश देशोधडीला लागला आहेशेतक-यांचा विषय गंभीर आहे. कामगारांना न्याय मिळत नाही त्यामुळे मतदारांनी जागे झाले पाहिजे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शहरी आणि गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी पूर्ण पर्यंत करणार असल्याचे मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

 

दरम्यानमतदारांकडून आणि जेष्ठ नागरिकतरुणांकडून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे मनापासून स्वागत केले. अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारं नेतुत्व आणि समाजाची असलेलं नाळ अश्या भावना या वेळी मतदारांनी व्यक्त केल्या.

 

अन् चिमुकलीने उमेदवार वाघेरे पाटलांना भरविला पेढा...

 बिजलीनगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे  गावभेट दौरा करीत असताना एका लहान चिमुकलीने हि त्यांचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मतदार अक्षरशा भारावून गेले होते. वाघेरे पाटील यांच्यातील असलेला जीवाळा आणि प्रेम पाहून चिमुकलीने त्यांना पेढा भरविला.

 

गावभेटी दरम्यान काय म्हणाले मतदार...

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे मुद्देसूद पण सर्व सामान्य नागरिकाशी थेट बोलतातसमाजसेवेला प्रथम प्राधान्य देणारासर्व स्तरातील लोकांना आपुलकीने वागणेएकदम साधी राहणीमानयामुळे वाघेरे यांच्याभोवती लोकांचा घोळका जमा होत होताअसे चित्र या वेळी पहावयास मिळत होते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार संजोग वाघेरे पाटलांच्याच गळ्यात विजयाची माळ घालणार आणि स्वाभीमानी विचाराच्या शिवसेनेचा शिलेदार म्हणून त्यांना लोकसभेत पाठविणार आहोतअशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

 

बिजलीनगर, चिंचवड परिसरात संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रतिसाद ! बिजलीनगर, चिंचवड परिसरात संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रतिसाद ! Reviewed by ANN news network on ४/०८/२०२४ १०:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".