पुणे : मध्य रेल्वेने मागणी वाढल्यामुळे दौंड-अजमेर विशेष गाडीचा कालावधी वाढवला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली. या गाडीबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दौंड-अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष (20 ट्रीप)
दर शुक्रवारी धावणारी गाडी क्रमांक 09626 दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष दिनांक 05.4.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दिनांक 12.4.2024 ते 14.6.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (10 ट्रीप)
दर गुरुवारी धावणारी गाडी क्रमांक 09625अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष दिनांक04.4.2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, होती , ती आता दिनांक 11.4.2024 ते 13.6.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (10 ट्रीप)
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 09626 च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 11.4.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या. indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेतर्फ़े करण्यात आले आहे.
दौंड अजमेर विशेष गाडीचा कालावधी १४ जून पर्यंत वाढवला
Reviewed by ANN news network
on
४/१०/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: