सात गंभीर गुन्हे आहेत दाखल
पिंपरी : पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी महाळुंगे इंगळे परिसरात दहशत असलेल्या कुख्यात राहुल पवार टोळीवर मोका कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राहुल संजय पवार ( टोळी प्रमुख) रा. महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे, अमर नामदेव शिंदे वय २८ वर्षे रा.कासारआंबोली, ता. मुळशी, जि पुणे, नितीन पोपट तांबे वय ३४ वर्ष, रा. एफ / २०८, स्वदेशा सोसायटी, देहुगाव रोड, मोशी, पुणे अभिजीत ऊर्फ अभि चिंतामण मराठे रा. जयभवानी नगर कोथरुड पुणे, आसिफ ऊर्फ आशू हैदर हाफशी रा. दत्तूपठारे चाळ, कासारवाडी, पुणे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
या टोळीवर महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पौड या पोलीसठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही टोळी संघटित गुन्हेगारी करत असल्याने त्यांच्यावर मोक्का कायद्याखाली कारवाई करावी असा प्रस्ताव अपर आयुक्त परदेशी यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. त्याला त्यांनी मान्यता दिली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, उपायुक्त परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त गुन्हे- १ बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते, निरीक्षक अनिल देवडे, अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी,कोणकेरी यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
४/२०/२०२४ १०:५१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: