लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान; विश्वास पाठक यांची माहिती

 


प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ''अब की बार 400 पार'' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर  370 मते वाढविण्याचा निर्धार केला आहेअशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाठक बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. यासाठीचे बूथ विजय अभियान बुधवार 3 एप्रिल पासून सुरु होणार असून हे अभियान 6 दिवस चालणार आहेअसेही श्री.पाठक यांनी सांगितले.

श्री.पाठक म्हणाले कीविधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्ना प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार  आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहेअसेही श्री.पाठक यांनी नमूद केले.

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणेप्रत्येक घरवाहनावर स्टिकर्स लावणेलाभार्थींशी नियमित संपर्कात राहणेप्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्गमहिला अशा  समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतीलअशी माहितीही श्री.पाठक यांनी दिली. भाजपा शी संबंधीत नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य व योजना पोहोचवून भाजपा ला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल तसेच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मते महायुती उमेदवारालाच जातील याकडे  विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे श्री. पाठक यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान; विश्वास पाठक यांची माहिती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान; विश्वास पाठक यांची माहिती Reviewed by ANN news network on ४/०२/२०२४ ०९:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".