सोयगाव घरफोडी प्रकरण : एकाच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखा व सोयगाव पोलिसांची संयुक्त कारवाई..
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत झालेल्या तीन घरफोडीच्या अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अटक करून बुधवारी सोयगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्याची शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यातील आमखेडा, कंकराळा येथील तीन तासात तीन घरफोड्या करणारा आरोपी प्रवीण सुभाष पाटील,(वय ३५) रा बिलवाडी ता. जि. जळगाव हा अट्टल घरफोड्या करणारा असून त्याने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी एक वर्षांत वीस घरफोड्या केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सोयगाव पोलीस हे मुद्देमाल रिकव्हरी साठी जळगावला रवाना झाले आहे .
सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंकराळा गावात सदर आरोपीने रस्त्याच्या लगत असलेल्या आत्माराम मनीराम गायकवाड(वय ४५) हे कुटुंबा सह बाहेर गावी गेले असता त्यांच्या घरांचे कुलूपबंद तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील टरबूज विक्री व कापूस विक्रीतून कमावलेले सात लाख ८० हजार रु रोकड तर आमखेडा येथील रामकृष्णनगर भागातील विजय नरोटे व छायाबाई बोडखे या दोघांची घरे कुलूपबंद असल्याचे पाहून त्या दोन्ही घरांची दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून विजय नरोटे यांच्या घरातील दोन लाख ६१ हजार रु चे चार तोळे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने व छायाबाई बोडखे यांच्या कुलूपबंद घरातील रोख रक्कम २५ हजार रु लांबविली होते दरम्यान सोयगाव पोलिसांनी व छत्रपती सभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दि.१५ सोमवारी तातडीने तपास चक्रे फिरवून मंगळवारी सायंकाळी जळगाव गाठून अट्टल गुन्हेगार असलेल्या प्रवीण सुभाष पाटील,(वय ३५) रा बिलवाडी ता. जि. जळगाव यास शिताफीने चौकशी साठी जळगाव शहरात ताब्यात घेतले असता,सोयगाव च्या हद्दीत त्यानेच तिन्ही घरफोड्या केल्या चे तपासात निष्पन्न झालेवरून त्यास अटक केली.
जळगाव जिल्ह्यात वीस घरफोड्या करून लढविली होती ग्रामपंचायत निवडणूकसदर आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी या गावातील असून त्याने २०२३ मध्ये एकाच वर्षांत वीस घरफोड्या करून गावाची ग्रामपंचायतची सरपंच पदासाठी निवडणूक लढविली होती त्याच्या या गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर च्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यास चौकशी च्या रडार घेतले असता सोयगावच्या हद्दीतील हाच घरफोड्या असल्याचा संशय बळावल्याने त्यास जळगाव मधून अटक केली होती ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव कासम शेख,विठ्ठल डोखे,गोपाल पाटील सोयगाव चे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, राजू बर्डे,दिलीप पवार,विनोद सपकाळ,गजानन दांडगे अजय कोळी रवींद्र तायडे आदींनी केली आहे.
सोयगाव घरफोडी प्रकरण : एकाच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखा व सोयगाव पोलिसांची संयुक्त कारवाई..
Reviewed by ANN news network
on
४/१९/२०२४ १०:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: