मुंबई : होळी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज २४ मार्च रोजी होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिकेला मनोभावे वंदन केले. तसेच होळी पेटवून समाजातील वाईट गोष्टींचा नाश करून सर्वांना सुख समाधान मिळावे एवढेच मागणे होलिकेकडे मागितले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा