पिंपरी : भोसरीतील बसस्टॉपवर बसमध्ये चढणार्या गर्दीत शिरून प्रवाशांचे दागिने चोरणार्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे तीन गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहन गणेश जाधव (वय-32 रा. केशवनगर, संभाजी चौक, मुंढवा मूळ रा. शास्त्रीनगर झोपडपट्टी, अंबरनाथ) व शिवराज अर्जुन वाडेकर (वय-25 रा. मशिदीजवळ, पवारवस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरांची नावे आहेत.
भोसरीमध्ये बसस्टॉपवर होणार्या चोर्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीसपथक तपास करत होते. पथकाला भोसरी बसस्टॉपवर दोघे संशयास्पदरित्या वावरताना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायक आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहायकफौजदार राकेश बोयने, अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, प्रतिभा मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे,तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ०४:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: