रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाने आपल्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून घेतल्याने त्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने १२ मार्च रोजी पकडले.या प्रकरणी राजापूर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशिल रामदास पवार, वय ४३ वर्षे असे या उपअधीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात तक्रार दिलेल्या व्यक्तीच्या जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी सुशिल पवार याने आपल्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून देण्याची मागणी १ आणि ६ मार्च रोजी तक्रारदाराकडे केली होती. ८ ते १० मार्च या शासकीय सुटीच्या काळात केबिनचे रंगकाम तक्रारदाराकडून करून घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने १२ मार्च रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पवार याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, आणि महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा