दिघी पोलिसांची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीसठाण्याच्या अधिपत्याखालील दिघी पोलीसठाण्यातील कर्मचार्यांनी एका सराईत मोटारसायकलचोराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
२५ मार्च रोजी धुळवड असल्याने दिघी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दोघेजण मोटारसायकलीवरून जात असताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जाऊ लागले. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
त्यावेळी त्यांची चौकशी केली असता ते मोटारसायकलचोर असल्याची कबुली त्यांनी दिली. या पैकी सज्ञान आरोपीचे नाव संतोष जयहिंद्र गुप्ता, वय १९ वर्षे, रा. शिंदे चाळ, खंडोबामाळ, भोसरी, पुणे असे आहे.
या दोघांकडून २ लाख ८० हजार रुपयांच्या ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी दिघी पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ तपास पथकातील सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, हवालदार पोटे,कांबळे, जाधव, शिपाई जाधव, काकडे, भोसले, कांबळे यांनी केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: