मुंबई : स्वतःच्या रक्षणासाठी घेतलेली शस्त्रे घेऊन दुसर्या व्यक्तीस सुरक्षा पुरविणार्या तिघांना कुर्ला येथे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर नेहरूनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिलकुमार विजय नारायण मिश्रा, वय ५३ वर्षे,राजकुमार लालता सिंग, वय ५२ वर्षे, देवनारायण हरीराम जैस्वाल, वय ४८ वर्षे, सर्व मूळ राहणार उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्यांची नावेव आहेत.
हे तिघेही उत्तरप्रदेशात परवाना असलेली शस्त्रे घेऊन महाराष्ट्रात आले होते. ते बॉडीगार्ड म्हणून अन्य खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरवित होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्रिवेणी बारसमोर, कुर्ला येथे सापळा लावून या तिघांना अटक केली. हे तिघेही मुंबई, ठाणे परिसरात सुमारे १० वर्षांपासून रहात असून त्यांनी शस्त्रपरवान्यामध्ये बदल करून घेतला नव्हता. अथवा स्थानिक पोलीसयंत्रणेला त्याची माहितीही दिली नव्हती.
त्यांच्या विरोधात नेहरूनगर, कुर्ला पोलीसठाण्यात ११७/२०२४ क्रमांकाने शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: